Monday, April 21, 2025
28.1 C
Delhi
Monday, April 21, 2025
spot_img
Homeप्रदेशमहायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील खाते वाटप जाहीर

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील खाते वाटप जाहीर

महाराष्ट्र कट्टा : आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस. दरम्यान, सरकार स्थापन होऊन पंधरा दिवसांहून अधिक काळ उलटल्यानंतर आज अखेर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फडणवीस सरकारचे खाते वाटप कधी जाहीर होणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण आज फडणवीस सरकारचं खाते वाटप जाहीर झालंय.खरे तर, 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यानंतर तब्बल बारा दिवसांनी म्हणजे 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला होता. यानंतर दहा दिवसांनी म्हणजे 15 डिसेंबर रोजी 39 मंत्र्यांनी शपथ घेतली.

खाते वाटप खालील प्रमाणे :-

कॅबिनेट मंत्री:- 1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)

3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण

4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

5.गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

6.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा

7.गणेश नाईक – वन

8.दादाजी भुसे – शालेय शिक्षण

9.संजय राठोड – माती व पाणी परीक्षण

10.धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

11.मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

12.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा

13.जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल

14.पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

15.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर

16.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय

17.शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

18.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान

19.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

20.अदिती तटकरे – महिला व बालविकास

21.शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम

22.माणिकराव कोकाटे – कृषी

23.जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज

24.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन

25.संजय सावकारे – कापड

26.संजय शिरसाट – सामाजिक न्याय

27.प्रताप सरनाईक – वाहतूक

28.भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन

29.मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन

30.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे

31.आकाश फुंडकर – कामगार

32.बाबासाहेब पाटील – सहकार

33.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री (State Ministers )

34. माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण

35. आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

36. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा

37. इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन

38. योगेश कदम – गृहराज्य शहर

39. पंकज भोयर – गृहनिर्माण,

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular