MPSC कडून वर्षभराचे वेळापत्रक जाहीर:- स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) 2025 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक नुकतंच जाहीर केलं आहे.,
2025 मध्ये MPSC मार्फत अनेक परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार आयोगाने http://mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर हे वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे. याशिवाय परीक्षांचे वेळापत्रक तयार करताना विविध दोन परीक्षा एकत्र येणार नाही याची देखील काळजी आयोगाने घेतली आहे.
2025 मध्ये MPSC मार्फत ‘या’ परीक्षा घेतल्या जाणार! :
▪️ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षांमध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर्व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा
▪️ महाराष्ट्र अराजपत्रित गट- ब आणि गट-क सेवा संयुक्त परीक्षांमध्ये महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
▪️महाराष्ट्र अराजपत्रित गट- ब सेवा मुख्य परीक्षा
▪️ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा
▪️महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा
▪️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षामध्ये महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
▪️अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा
▪️महाराष्ट्र विद्युत आणि यांत्रिकी परीक्षा
▪️अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा
▪️महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा
▪️महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा
▪️महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा
▪️महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा
▪️निरीक्षक वैद्यमापक शास्त्र मुख्य परीक्षा
▪️राज्यसेवा मुख्य परीक्षा
▪️महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा
