काळेवाडी- रहाटणी :- सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे, प्रभाग आरक्षण सुद्धा जाहीर झाले आहे, त्यामुळे अनेक इच्छुक निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत, मतदारांच्या गाठी भेटी वाढल्या आहेत.प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजपा रहाटणी पिंपळे सौदागर मंडळ अध्यक्ष सोमनाथ मोहन तापकीर यांनी निवडणूक लढण्याविण्यासाठी कंबर कसली आहे.

सोमनाथ तापकीर यांनी 2017 च्या निवडणुकीत पराभव स्वीकारून सुद्धा कोणत्याही सामाजिक कार्यात तडजोड केली नाही अशी चर्चा परिसरात आहे, त्यांनी आपल्या सामाजिक कार्यात अनेक रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, अन्नदान, महिलांसाठी नवरात्र उत्सव, होम मिनिस्टर कार्यक्रम, विद्यार्थी साठी विविध स्पर्धा, शालेय वस्तू वाटप, कोरोना काळात अनेक शिबीरांचे आयोजन असे अनेक समाज उपयोगि कार्य केले आहेत.यांच्या माध्यमातून प्रभागातील येणार्या अडचणी त्यांच्या समस्या सोडवल्या जातात. त्यांच्या सोबत नागरिकांचा प्रतिसाद भक्कम पणे त्यांच्या वर असलेला विश्वास सर्वत्र उघडपणे दिसून येत आहे.
प्रेमळ, विनोदी, संयमी, अभ्यासूवृत्ती, युवकांमध्ये प्रसिद्ध तसेच सामान्य जनतेचे नेतृत्व करणारा, जबाबदारी ने कामे करणारा आपला हक्काचा माणूस म्हणून ओळख निर्माण केली आहे.
त्यांनी या माध्यमातून प्रभाग क्रमांक 22 मधील मतदारांना प्रामाणिक पणे आवाहन केले आहे कि एकदा संधी देऊन बघा संधीचे सोने करून दाखविणार असा विश्वास दाखवीला आहे.
Your Attractive Heading





