पुणे (10/02/2026):सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘राजमुद्रा फाउंडेशन’च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी श्री. समाधान तुकाराम इंगवले यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक-संचालक डॉ. मनोहर शिंदे व सौ. शिल्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. अमोल ठाकरे यांच्या विशेष सूचनेनुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.समाधान इंगवले यांची सामाजिक कार्याप्रती असलेली तळमळ, जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण आणि संघटनेप्रती असलेली निष्ठा पाहून त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये फाउंडेशनचे कार्य विस्तारणे, युवकांचे संघटन करणे आणि गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देणे हे त्यांच्या कार्यकाळातील मुख्य उद्दिष्ट असणार आहे.या निवडीबद्दल बोलताना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अमोल ठाकरे म्हणाले की, “समाधान इंगवले यांच्या अनुभवाचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील संघटना बांधणीसाठी निश्चित होईल. त्यांच्या नेतृत्वाखाली राजमुद्रा फाउंडेशनचे कार्य अधिक प्रभावीपणे घराघरात पोहोचेल.”या नियुक्तीबद्दल पश्चिम महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय स्तरातून समाधान इंगवले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लवकरच ते आपल्या पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारून विभागातील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या आणि आगामी उपक्रमांची घोषणा करणार आहेत.
कार्यक्षेत्र: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.





