सोलापूर=11/02/2016):सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या **’राजमुद्रा फाउंडेशन’**च्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी श्री. डॉ. सुशिलकुमार माणिकराव शिंदे यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्यातील फाउंडेशनच्या कार्याला मोठी गती मिळणार असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.डॉ. शिंदे यांची सामाजिक कार्याची तळमळ आणि संघटनेप्रती असलेली निष्ठा विचारात घेऊन ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फाउंडेशनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. समाधान तुकाराम इंगवले यांच्या सूचनेने आणि महाराष्ट्र अध्यक्ष श्री. अमोल ठाकरे यांच्या अनुमोदनाने ही नियुक्ती करण्यात आली.जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यावर भरराजमुद्रा फाउंडेशनची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि जनसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडणे, ही प्रमुख जबाबदारी डॉ. शिंदे यांच्यावर असणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात फाउंडेशनचे कार्य अधिक जोमाने वाढेल, असा विश्वास संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
शुभेच्छांचा वर्षाव या निवडीबद्दल डॉ. शिंदे यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. फाउंडेशनचे मार्गदर्शक डॉ. मनोहर शिंदे (संचालक, राजमुद्रा फाउंडेशन) आणि सौ. शिल्पा शिंदे (संचालिका, राजमुद्रा फाउंडेशन) यांनी डॉ. शिंदे यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी बोलताना नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉ. सुशिलकुमार शिंदे यांनी, “दिलेल्या पदाचा सन्मान राखून जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि संघटनेच्या विस्तारासाठी आपण सदैव तत्पर राहू,” असा निर्धार व्यक्त केला आहे





