पुणे (13/02/2026) :सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या **’राजमुद्रा फाउंडेशन’**च्या पुणे शहर महिला अध्यक्षपदी सौ. राजश्री संतोष घोरपडे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक आणि संघटनात्मक कार्याची दखल घेऊन संस्थेच्या वतीने ही महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.राजमुद्रा फाउंडेशनचे संचालक मा. डॉ. मनोहर शिंदे व मा. सौ. शिल्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. अमोल ठाकर यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीला महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा सौ. राजश्री मोहिते यांनी अनुमोदन दिले आहे.सौ. राजश्री घोरपडे यांचा जनसंपर्क, प्रशासकीय कामाचा अनुभव आणि प्रभावी नेतृत्वगुण विचारात घेऊन ही निवड करण्यात आली असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. ‘महिलांचे सक्षमीकरण, त्यांचे प्रश्न आणि समाजहितासाठी राजमुद्रा फाउंडेशनच्या माध्यमातून पुणे शहरात आक्रमकपणे व पारदर्शकपणे काम करणार’ असल्याचा निर्धार नवनियुक्त अध्यक्षा सौ. राजश्री घोरपडे यांनी व्यक्त केला.संस्थेच्या नियमावलीनुसार शिस्त आणि कार्यक्षमता राखून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या कार्यरत राहतील, असा विश्वास संचालकांनी व्यक्त केला आहे. या निवडीबद्दल पुणे शहरातील विविध सामाजिक स्तरातून व राजमुद्रा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून सौ. राजश्री घोरपडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा जागर करण्यासाठी सौ. राजश्री ताईंची निवड करण्यात आली आहे. संस्थापक संचालक मा. डॉ. मनोहर शिंदे व मा. सौ. शिल्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जबाबदारी देण्यात आली आहे.




