Thursday, September 17, 2026
28 C
Delhi
Thursday, September 17, 2026
spot_img
HomeBlogहिंगणगाव बु. येथील श्री नारायणस्वामी देवस्थानाचा ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र योजनेत समावेश

हिंगणगाव बु. येथील श्री नारायणस्वामी देवस्थानाचा ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र योजनेत समावेश

हिंगणगाव बु. येथील श्री नारायणस्वामी देवस्थानाचा ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र योजनेत समावेश मंदिर परिसराच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांपर्यंत निधी मिळण्याचा मार्ग मोकळा;

आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या पाठपुराव्याला यश हिंगणगाव बु. (ता. कडेगाव) : हिंगणगाव बु. येथील प्रसिद्ध श्री नारायणस्वामी देवस्थान मंदिराचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत समावेश करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय ग्रामविकास विभागामार्फत जारी करण्यात आला असून, त्यामुळे मंदिर परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.श्री नारायणस्वामी देवस्थान हे परिसरातील प्रसिद्ध धार्मिक व यात्रास्थळ असून सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर यांसह विविध भागांतून भाविक येथे दर्शनासाठी येतात. यापूर्वी या देवस्थानाचा ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश करण्यात आला होता.मात्र, यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी देवस्थानाचा ‘ब’ वर्ग यात्रास्थळ योजनेत समावेश करण्यात यावा, अशी मागणी आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी शासनस्तरावर केली होती.या मागणीचा पाठपुरावा करताना संबंधित प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार शासनाने निर्णय घेत श्री नारायणस्वामी देवस्थान मंदिराचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत समावेश केला आहे.

विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध होणार‘ब’ वर्ग यात्रास्थळाचा दर्जा मिळाल्यामुळे मंदिर परिसरातील विविध पायाभूत सुविधा व भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांपर्यंत निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.यामुळे मंदिर परिसराचे सुशोभीकरण, भाविकांसाठी सुविधा, यात्रेच्या काळातील व्यवस्थापन तसेच आवश्यक पायाभूत विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.शासनाच्या या निर्णयामुळे हिंगणगाव बु. परिसरातील ग्रामस्थ व भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या पाठपुराव्याचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे.

महाराष्ट्र कट्टा | हिंगणगाव बु | दोस्ती ग्रुप

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular