Sunday, March 1, 2026
29.1 C
Delhi
Sunday, March 1, 2026
spot_img
HomeBlogराजमुद्रा फाउंडेशनच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी मिलिंद वाणी यांची नियुक्ती

राजमुद्रा फाउंडेशनच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी मिलिंद वाणी यांची नियुक्ती

जळगाव: 10/02/2026. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या राजमुद्रा फाउंडेशनच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी श्री. मिलिंद दत्तात्रय वाणी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील दीर्घ अनुभवाचा विचार करून ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.संस्थापकांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब राजमुद्रा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोहर शिंदे व सौ. शिल्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र अध्यक्ष श्री. अमोल ठाकर यांच्या सूचनेनुसार ही अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

श्री. वाणी हे गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत.सेवाभावी वृत्तीचा सन्मानमिंलिंद वाणी यांनी आतापर्यंत गोरगरीब जनता, रुग्ण आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी मोठे कार्य केले आहे. त्यांच्या या सेवावृत्तीचा आणि जनसंपर्काचा फायदा फाउंडेशनचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी होईल, असा विश्वास संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोहर शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

सर्व स्तरातून कौतुकया नियुक्तीबद्दल बोलताना महाराष्ट्र अध्यक्ष अमोल ठाकर म्हणाले की, “वाणी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ही संधी देण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात सामाजिक कार्याला मोठी गती मिळेल.”

या निवडीनंतर श्री. मिलिंद वाणी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांनी संस्थेचे उद्दिष्ट प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

शुभेच्छुक:श्री. अमोल ठाकर (महाराष्ट्र अध्यक्ष, राजमुद्रा फाऊंडेशन)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular