Friday, July 10, 2026
31.1 C
Delhi
Friday, July 10, 2026
spot_img
HomeBlogप्रशांत भागवत कदम यांची 'राजमुद्रा फाउंडेशन'च्या लातूर जिल्हा अध्यक्षपदी निवड

प्रशांत भागवत कदम यांची ‘राजमुद्रा फाउंडेशन’च्या लातूर जिल्हा अध्यक्षपदी निवड

लातूर (09/02/2026):आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन लातूरचे श्री. प्रशांत भागवत कदम यांची ‘राजमुद्रा फाउंडेशन’च्या लातूर जिल्हा अध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.राजमुद्रा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोहर शिंदे व सौ. शिल्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. महाराष्ट्र अध्यक्ष श्री. अमोल ठाकर यांनी या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली असून, महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. प्रवीण देशमुख यांनी या निवडीला अनुमोदन दिले आहे.

सामाजिक कार्याची दखलप्रशांत कदम हे गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात अविरतपणे कार्य करत आहेत. विशेषतः गोरगरीब जनता, रुग्ण आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी त्यांनी केलेली निस्पृह सेवा अत्यंत कौतुकास्पद ठरली आहे. त्यांच्या याच अनुभवाचा आणि दातृत्वाचा फायदा संघटनेला व्हावा, या हेतूने त्यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नूतन अध्यक्षांचे संकल्पआपल्या नियुक्तीबद्दल बोलताना प्रशांत कदम यांनी वरिष्ठांचे आभार मानले. “संस्थेची ध्येयधोरणे आणि सामाजिक उपक्रम लातूर जिल्ह्यातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.या निवडीबद्दल जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भावी वाटचालीस अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular